Wednesday, April 20, 2011

bhet..

भेटीचा इरादा नाही ..
..अन वेळही ज्यादा नाही
मी घाईच केली नसती..
पण मौसम साधा नाही..!!!

Tuesday, April 19, 2011

kavi sammelan..

मी ..

असाच आहे वेडा मी अन.. 
असेच होते माझे ..
तू खोल म्हणालीस खिडकी अन मी..
उघडलेत दरवाजे !

Wednesday, April 13, 2011

samudra..

समुद्राचं सारच वेगळं 
वेगळं आणि खास 
पाऊस असो , पाऊस नसो 
लाटा चोवीस तास ! 
--ज्ञानेश वाकुडकर

Sunday, April 3, 2011

nadi

नदी..
   
   एक नदी आटली म्हणून 
  थांबत नाही भरती ..
  सागर कधी जगत नसतो 
  अनुदानावरती !

dnyanesh wakudkar boltoy !: dehruutuu ..

dnyanesh wakudkar boltoy !: dehruutuu ..: "हे देहऋतू सारे आलेत ऊतू सारे मेघ बरसतो धो धो तरीही जळते का जाई ? सजनास पता नाही ! -ज्ञानेश वाकुडकर"

dehruutuu ..

देहरूतू ..
हे देहरूतू सारे ..
आलेत उतू सारे ..
अन वणव्यांची चर्चा ..
करतात पहा वारे ..
मेघ बरसतो धो धो तरीही.. 
जळते का जाई ?
सजणास पता नाही ..
सजणास पता नाही !!

_ज्ञानेश वाकुडकर    

dehruutuu ..

हे देहऋतू सारे
आलेत ऊतू सारे
 मेघ बरसतो धो धो तरीही
 जळते का जाई ?
  सजनास पता नाही !
 
 -ज्ञानेश वाकुडकर